सांगोला प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच खा संजय राऊत हे थुंकले व प्रसारमाध्यमांबाबत बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुका शिवसेना, युवा सेना , शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील विचार मंच यांच्यावतीने काल सांगोला येथील वासूद चौकात खा. संजय राऊत यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मार आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी 'अरे या संजय रावताचे करायचे काय खाली मुंडके वर पाय.. धिक्कार... असो धिक्कार... असो संजय रावताचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन रावताचा निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा दादा खटकाळे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर ,उद्योगपती अभिजीत नलवडे, संजय मेटकरी, बाळासाहेब आसबे,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, पांडुरंग मिसाळ, अजिंक्य शिंदे , संजय गव्हाणे, धीरज पवार, सचिन काळे, पप्पू इंगोले, दीपक दिघे ,दीपक पवार ,आदित्य नागणे ,अजय सुरवसे ,अक्षय पवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबत बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमाशी बोलताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता त्यावेळी राऊत हे श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकले होते.त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावेळी तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी प्रसार माध्यमाची बोलताना ,संजय राऊत याच्या मेंदूला पॅरालिसचा आजार झालाय त्यामुळे त्याच्यावर लवकर उपचार करणे गरजेचे आहे अन्यथा हा माणूस रस्त्यावर उभा राहून दगड मारायला कमी करणार नाही उद्धव ठाकरे, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आम्ही विनंती करतो , सांगोला तालुक्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने डागण्याचे काम करतो, तुमची परवानगी असेल तर संजय रावताला सांगोला तालुक्यातील शिवसैनिकाच्या स्वाधीन करा, त्याच्या मेंदूला चांगल्या पद्धतीने डाग देऊन उपचार करू व भविष्यात अशी बेताल वक्तव्य करणार नाही याची काळजी घेऊ अशा शब्दात
अशा शब्दात त्याचा वक्तव्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला.