सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे संस्थापक अध्यक्ष लायन नागेश जी बुगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुगडे परिवार च्या वतीने सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर सोलापूर येथे क्लब अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ लायन सोमशेखर भोगडे व ममता बुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यानंतर अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांनी क्लबच्या वतीने वाढदिवसानिमित्त नागेश जी बुगडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.