पंढरपूर प्रतिनिधी
दिल्ली मधील शहाबाद येथील साक्षी नावाच्या निरपराध १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर साहिल नावाच्या नराधमाने २१ वेळा चाकुचे वार करुन व ६ वेळा दगडाने ठेचून भर रस्त्यात हत्या केली.
या घटनेचा अभाविप पंढरपूरच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री आनंद भुसनर, प्रणाली जगदाळे, ऋतुजा गायकवाड, ऋतुजा शिंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.