सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते या प्रशालेचा मार्च 2023 दहावी परीक्षेचा निकाल 99.04 टक्के लागला आहे.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून सेमी माध्यमाचा निकाल 100% लागला आहे. कु.चव्हाण पायल शंकर 92 टक्के गुण मिळवून प्रथम तर चव्हाण सृष्टी शशिकांत 91.60 टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच आंबेकर आशुतोष अतुल 90.20 टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजित शिनगारे,वरिष्ठ लिपीक राजकुमार ढगे व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या विषय शिक्षकांबरोबरच कला-क्रीडा विषयाचे वाढीव गुण विद्यार्थ्यांना मिळत असल्याने त्यांना मार्गदर्शन करणा-या संबंधित शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर,सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष शिवाजी वाघ, सहसचिव अजित नडगिरे,खजिनदार सलिम वडगावकर,जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे,दिलीप घाडगे,अनिरुद्ध सालविठ्ठल,मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर व सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.