सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील जनसेवा हिच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन मार्फत दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकुमार नारायणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीवनधारा पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भरले,सोमेश्वर पतसंस्थेचे उपाध्यक्ष सोमनिंग व्हनमाने, समर्थ सहकारी बँकेचे मॅनेजर संजय मंमदापुरे, ॲड.आसमा बागवान, नागनाथ कलसुरे,कांचन कुंभार,सुवर्णा शिलेणी आदी उपस्थित होते. अफरोज सगरी, सोमनाथ आकळवाडे, रक्षिता भरले, समीक्षा तेली, संचिता पाटील, अक्षता कोळी, समृद्धी अवताडे,अमोल राठोड, वैष्णवी छपेकर,अपेक्षा कांबळे,श्रुती नारायणे,प्राची भरले, निकिता कुलकर्णी,आरती कुंभार, सोनाली चव्हाण आदी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोघ पुजारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष डोगे, नीलकंठ पाटील, राघवेंद्र पाटील, परमेश्वर कुलकर्णी, राहुल पाटील, महेश अवताडे, विठ्ठल डोगे, स्वराज रोणे, विनय कोरे, मयुर पुजारी, भीमाशंकर हिरकुर व जनसेवा हीच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.