पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या सेवानिवृत्ती निमित्त माजी विद्यार्थी व सहकारी यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पाराध्ये यांनी 35 वर्षे दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षक, प्राचार्य म्हणून काम केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती पंढरपूरचे माजी सभापती वामनराव माने हे होते त्यांनी पाराध्ये हे एक उत्कृष्ट,उपक्रमशील शिक्षक असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे हे होते.
त्यांनी पाराध्ये यांच्या कार्याचा गौरव करून शिक्षक हे देशाचे उद्धारक असतात असा उल्लेख केला. पांडुरंग सहकारी कारखान्याचे संचालक किसनराव सरवदे यांनी त्यांच्या काळातील जुन्या आठवणी सांगून पाराध्ये यांनी प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगितले.या प्रसंगी पाराध्ये यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
तसेच दीपस्तंभ या गौरवअंकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पाराध्ये यांनी सांगितले की मला संस्थेने सर्व काही भरभरून दिले आहे .माझे विद्यार्थी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत यामध्ये मी समाधानी आहे. कार्यक्रमाचे नियोजन डॉ.बिभीषण रणदिवे, बाळासाहेब शिंगाडे, प्राचार्य मोहम्मद शेख ,अडगळे एस. व्ही, शशिकांत पोद्दार, सर्जेराव पडळकर, चंद्रकांत सातपुते, मारुती माने, दत्तात्रय अवघडे, डॉ किशोर खिलारे,राजूभाई मुलाणी,अर्चना कुंचे, सुहास मासाळ व माजी विद्यार्थी परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी केला होता.
या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने , अखिल भारतीय बिल्डर्स असोसिएशन अध्यक्ष दत्ता मुळे,आप्पासाहेब चोपडे, सिनेअभिनेता राहुल हजारे सर्व शिक्षक ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.