पंढरपूर प्रतिनिधी
मोहोळ - पंढरपुर ते धर्मपुरी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ चे काम नोव्हेंबर २०२० पासून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे वतीने करण्यात सुरू असून सदर राष्ट्रीय महामार्गावर मौजे तुंगत ता. पंढरपूर येथे महामार्गावर निर्माणधीन असलेल्या पुलाचे (VOP) भिंतीवर दि. १०/०६/२०२३ रोजीचे सकाळी १०/०० वा ते रात्रौ ११/०० वाजणेचे दरम्यान "डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग तुंगत" अशा नावाचा व त्यावर छशिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, साहित्यरत्न आण्णाभाउ साठे या महापुरुषांचे फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता.
सदर बाबीचे अनुशंगाने डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग व श्री मिलिंद पाटील पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी तातडीने भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सदरचा पुल हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येत असल्याने त्याबाबत संबधित विभागास सुचना करण्यात आल्या असुन सदर भुयारीमार्ग पुलावर लावण्यात आलेले डिजीटल बॅनर हे बेकायदेशीररित्या लावण्यात आले होते. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने अनाधिकृतपणे डिजीटल बॅनर लावणारे १) अमर महांकाळ फडतरे, २) दिपक पोपट वनसाळे३) देवानंद नामदेव सावंत ४) बदाशराव महादेव वनसाळे) संदीप पोपट वनसाळे ६) निखील चंद्रकांत वनसाळे ७) अविनाश उत्तरेश्वर वनसाळे ८) राजाराम नालिंदर सावंत ९) स्वप्नील चंद्राकांत वनसाळे १०) वामन रामचंद्र वनसाळे सर्व रा तुंगत ता पंढरपुर या लोकांवर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६५ वरील पुलाच्या भिंतीवर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग तुंगत अशा वर्णनाचा डिजिटल बोर्ड / बॅनर सार्वजनीक रस्त्यावरील पुलाच्या भिंतीला लोखंडी खिळे मारुन नुकसान करुन अनधिकृतपणे कोणतीही परवानगी न घेता शासकीय नियमांचे उल्लघंन करून लावल्यामुळे त्यांचे विरुध्द पंढरपुर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. ४१३/२०२३ भा.द.वि. कलम ४३१, ३४, सह महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री मिलिंद पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / ११५ स्वप्नील वाडेदकर हे करीत आहेत.
आवाहन
पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हददीतील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, कोणत्याही सार्वजनिक मालमत्ता, इमारती, पुल, रस्ते या ठिकाणी कोणीही अनधिकृतपणे डिजिटल बोर्ड, बॅनर, कटआउट, झेंडे, जाहीरात फलक, अथवा रंगाचा वापर करून कोणीही सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण / विरूपण करू नये अन्यथा त्याचेविरूध्द महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम ३ प्रमाणे व प्रचलित अधिनियमाव्दारे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येइल याची नोंद घ्यावी.