पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी उत्तरेश्वर मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंढे यांनी यापूर्वीचे ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे विज्ञान विषया मध्ये त्यांचे प्राविण्य आहे.प्रशालेच्या व संस्थेच्या, महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांचे योगदान आहे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले .
यावेळी सचिव ॲड. वैभव टोमके, खजिनदार सलीम वडगावकर, मुख्य लिपीक हनुमंत मोरे,पर्येंवेक्षक सुनील पाटील, अधीक्षक अमोल हुंगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.