पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाने कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जावे व या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात केल्या आहेत
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ व्हावा या हेतूने शासन आपल्या द्वारी ही योजना राबविण्यात येत आहे या उपक्रमा अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदे च्या वतीने शहरातील ३१ दिव्यांग यांना मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभहस्ते क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले शहराध्यक्ष गणेश ननवरे उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळूजकर यांच्या उपस्थितीत निधीचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले की प्रत्येक वर्षी शहरातील दिव्यांगाना दिव्यांग निधीचे वाटप केले जाते व इतरही वेळोवेळी मदत करण्यात आलेली आहे त्यामुळे या वर्षासाठी सुद्धा जे कोणी अर्ज करण्याची राहिली असेल त्यांनी त्वरित नगरपरिषदेकडे दिव्यांग निधीची मागणी करावी टप्प्याटप्प्याने सर्वांना या निधीचे वाटप करण्यात येईल असे सांगितले.
या कार्यक्रमास सहाय्यक खरेदी पर्यवेक्षक सचिन मिसाळ, लिपिक संतोष एतवाडकर रोखपाल गणेश धारूरकर हे उपस्थित होते तसेच
तालुकाध्यक्ष उमेश गोडसे, संतोष पवार ,अमर प्रक्षाळे ,सागर अष्टेकर, गजानन नेवासकर गजानन शिंदे, योगेश बारस्कर, सरिता मानें, दिपाली शिंदे, जयश्री गायकवाड हे उपस्थित होते