पुणे प्रतिनिधी
"हुरूप" संमेलन ....एकांड शिलेदार म्हणून सहभागी झाले ...शून्य कचरा कार्य आता संमेलन पर्यंत पोहचले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित, सामाजिक कार्यातील स्वयंप्रेरीत व्यक्तींच्या एक-जन संमेलनाचे उद्घाटन दि. १७-१८ जून २०२३ रोजी, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.
या संमेलनामध्ये प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, संमेलनाचे समन्वयक श्रीकांत पटवर्धन उपस्थित होते. प्रमोद कुलकर्णी, सुहास वैद्य, विद्याधर वालावलकर, सदाशिव चव्हाण, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. हर्षदा देवधर, वृषाली जोगळेकर आणि मिलिंद भणगे यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील शहरी-ग्रामीण भागातून आलेल्या एकांड्या शिलेदारांशी संवाद साधला.
समारोप प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी मार्गदर्शन केले. संमेलनामध्ये सुहास वैद्य लिखित "असू अम्ही सुखाने पत्थर पायातील...!" या समाजातील उत्तुंग नररत्नांवरील पुस्तकाचे प्रकाशन भारतीय सैन्यासाठी ऑक्सीजन प्लांट उभारून देणाऱ्या वीरपत्नी सुमेधा चिथडे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्रबोधिनीचे संचालक उमेश मोरे आणि मिलिंद आरोलकर उपस्थित होते.