सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब प्रांत 32 34 ड-1 ची कर्तुत्व गौरव डिस्टिक अवॉर्ड नाईट ही मा. प्रांतपाल लायन राजशेखर जी कापसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सांगली येथे पार पडली यामध्ये लायन्स क्लबचा मानाचा व अतिशय महत्त्वाचा आसणारा बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द डिसट्रीक्ट (बिलो 30) या गोल्ड अवॉर्ड ने लायन अभियंता सागर पुकाळे तसेच ह्या वर्षातील बेस्ट ॲक्टिविटी अवॉर्ड, उत्कृष्ट व्हिजन सेंटर अवॉर्ड, आणि बेस्ट कॅबिनेट ऑफिसर म्हणून लायन नंदिनी जाधव असे असे एकूण लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी या क्लबला अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांच्या नेतृत्वाखाली एकूण डिस्टिकचे 4 मानाचे आवार्ड मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे ह्या वर्षांमध्ये त्यांनी बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द झोन, बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द रीजन, बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द डिस्टिक व बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द मल्टिपल आणि बेस्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड असे लायन्स क्लब मधल्या सर्वोच्च अशा पुरस्कार प्राप्त करून लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी ला नंबर 1 वर नेहले आहे.
ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय नियोजनबद्ध आणि अभूतपूर्व यशाबद्दल माजी आंतरराष्ट्रीय संचालिका तथा लायन इंटरनॅशनल एल सी आय एफ च्या ट्रस्टी लायन डॉ. अरुणाजी ओसवाल माजी आंतराष्ट्रीय संचालक लायन डॉ. नवल जी मालू मल्टिपल कौन्सिलिंग चेअरमन लायन दिलीप जी मोदी प्रांतपाल लायन राजशेखरजी कापसे माजी मल्टिपल कौन्सिलिंग चेअरमन लायन गिरीशजी मालपाणी 32 34 D-2 माजी प्रांतपाल CA लायन अभयजी शास्त्री क्लब चे मार्गदर्शक माजी प्रांतपाल डॉ. नारायणदासजी चंडक यांच्यासह समाजातील अनेक स्तरातून विविध लोकांचा अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.