जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आमदार रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या सहकार्याने श्री स्वामी सेवक श्री संजय वेंगुर्लेकर, ठाणे यांनी जतन केलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे दर्शन, समर्थांच्या विविध लीलांची माहिती, श्री क्षेत्र अक्कलकोट मधील ११ मारुती मंदिर, श्री स्वामी समर्थांचे ३५ प्रमुख शिष्य, स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तूंचे, पादुकांचे, लीलास्थळांचे छायाचित्र तसेच विविध नामांकित श्री गणेशांची माहितीसह छायाचित्रे या समग्र दर्शन सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे
.हा दिव्य सोहळा शनिवार दिनांक ०३ जून २०२३ वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता स्व. दत्ताराम गोविंद वायकर स्मृती सभागृह, इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर, श्यामनगर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथे आयोजीत करण्यात आला आहे.
हा सोहळा शनिवार व रविवार दिनांक ०३ व ०४ जून पर्यंत सकाळी १० ते रात्री ०९ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.तरी या सुवर्णसंधीचा व स्वामी समर्थ दर्शनाचा लाभ जास्तीत जास्त भक्तांनी घ्यावा असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.