सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी शहर जिल्ह्यातील कुंभार समाजातील दहावी व बारावीत ७०.००% हून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले नावे दि.१७ जून पर्यंत निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे नोंदवावी अथवा गुणपत्रिका पोस्टाने पाठवावेत असे आवाहन नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. संपर्क -विठ्ठल कुंभार (९४२३५२६०७१), रविशंकर कुंभार (९४०४९९६२६१)
नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेल्या पंधरा वर्षांपासून कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येत आहे तसेच कुंभार समाजातील गुणवंतानी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच सेवानिवृत्त व पदोन्नती मिळालेल्या मान्यवरांचा सन्मान पूर्वक सत्कार करण्यात येत आहे तरी कुंभार समाजातील गुणवंतानी नावे नोंदवावी असे आवाहन संस्था अध्यक्ष श्री अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.