माढा प्रतिनिधी
आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. सदाशिव पेठेत एमपीएससी परीक्षेसाठी निघालेल्या मुलीला थांबवून खुले आम कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे स्वतःचा जीव वाचवत सैरावर पाळणारी गर्दी आणि त्याच गर्दीतून मदतीला धावून आलेला तरुण लेशपाल जवळगे.
लेशपाल जवळगे या मुलाने त्या हल्लेखोरांना रोखलं आणि मदतीला आलेल्या हर्षद पाटीलच्या सहाय्याने पकडून पोलिसात पाठवून दिलं. माढा तालुक्यातील आढेगावचा सुपुत्र लेशपाल जवळगे याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तुझं खूप खूप अभिनंदन !