भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील बाजीराव विहिरी जवळील पुलावर उभे रिंगण सोहळा मोठ्या जल्लोशात पार पडले.त्यामुळे वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटेल आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली चा गजर केला.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात दुपारी 12 वाजता पिराची कूरोली येथून सुरू झाला.आणि संध्याकाळी पाच वाजता बाजीराव विहिरी जवळ थांबला तर भंडी शेगाव येथून ज्ञानोबा महाराज पालखी सोहळा पाच वाजता बाजीराव विहिरी जवळ आली.त्यानंतर वारकऱ्यांनी पुलावर दोन्ही बाजूला रांगा केल्या.आणि या रांगमधून आश्र्वानी धावा केला.आणि हे नयन रम्य दृश्य पाहायला मिळाले.
आणि पालखी सोहळा पुढील मुक्काम करिता वाखरी कडे रवाना झाला.