पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते ,राज्याचे माजी पर्यावरण मंत्री श्रीआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपूर येथिल विठ्ठल मंदिराजवळ नामदेव पायरी येथे युवासेनेचे युवा नेते रणजित बागल यांचेकडुन "विठ्ठलाच्या महाआरती"चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी येथे उपस्थित चिमुकल्या वारकर्यांसह इतर भाविक भक्तांच्या उपस्थितीत रणजित बागल यांनी नियोजन करत आदित्य ठाकरे साहेबांच्या दिर्घायुष्यासह त्यांना उज्ज्वल भविष्य लाभावे ही भावना यावेळी व्यक्त केली व युवासेना शहरप्रमुख प्रमुख श्रीनिवास उंपळकर, सोनु मुजावर,जय माने यांचे प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.
यावेळी वारकरी भाविकांसह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.