पुणे प्रतिनिधी
चित्रपट हे समाजाचे चरित्रपट असतात, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा समर्थ वारसा मराठी माय भूमीला लाभली असताना त्या वारस्याला साजेल असं काम मराठीतील अनेक दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या माध्यमातून उभं केलं आहे . एक कलाकार घडण्यासाठी साधारण एक तपाहून अधिक काळ जात असतो आणि चांगली कलाकृती घडण्यासाठी तेवढ्याच ताकतीचा दिग्दर्शक देखील लाभायला लागतो. परंतु सध्याच्या घडीला मराठीतून चांगल्या प्रतीचे चित्रपट येत नाहीत आणि त्यामुळे मराठीला पेक्षक लाभत नाहीत असा सूर अनेक बुद्धीवाद्याकडून येत असतो.
नुकताच प्रदर्शित झालेला चौक हा चित्रपट गुन्हेगारी वृत्तीच समर्थन व गुन्हेगारीला खतपाणी घालणारा आहे.
पुणे शहर हे विद्येचे आणि सांस्कृतिक शहर म्हणून जगभरात नावलौकीक पावलेले आहे. पुणे शहरातील गणेशोस्तव हा पुणे शहराचा आत्मा आहे. आणि गणेशोत्सव कार्यकर्ता हा समाजमनाच्या रक्तवाहिन्या आहेत, हाच गणेशोत्सव आणि गणेशोत्सव कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं काम चौक या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे . *गणेशोत्सव म्हणजे गुंडगिरी , मारामाऱ्या हे समीकरण स्वतःची तुंबडी भरण्यासाठी दाखवण्याच कसब दिग्दर्शकाने दाखवल आहे . हा चित्रपट हा गुन्हेगारीच समर्थन करणारा असून त्यावर बंदी घालून संबंधित दिग्दर्शक आणि टिम वर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांना आज पत्र देण्यात आले.* या चित्रपटासाठी गुन्हेगारी विश्वातून आर्थिक देवाण घेवाण करण्यात आली असावी म्हणूनच गुन्हेगारी पुरस्कृत चित्रपटाची मालिका दिग्दर्शक आणि टिम कडून सुरु आहे का अशी चर्चा जनमानसात आहे .
यावेळी विजय क्षीरसागर , दिनेश भिलारे , स्वप्नील नाईक , योगेश वाडेकर , यादव पुजारी , राहुल शिंदे , प्रसाद वाईकर , सौरभ पवार , राजेश मोटे , निलेश जोशी , रवींद्र भांडवलकर , मिलिंद तिकोणे उपस्थित होते.