पनवेल प्रतिनिधी
श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, न्यू पनवेल ,इन्फिनिटी फाउंडेशन , मिनिस्ट्री युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स ,गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि नेहरू युवा केंद्र , अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११/ ०६/२०२३ रोजी "युवा उत्सव रायगड २०२३" उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्ह्यातून अनेक स्पर्धकांनी समुहनृत्य, गीत गायन, काव्यवाचन, चित्रकला , फोटोग्राफी, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री ,पंचायत राज, भारत सरकारचे कपिलजी पाटील ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले व उपस्थितांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
तर आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन व पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक धनराजजी विसपुते अमेरिका बोस्टन येथून कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले व उपस्थित सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमांमध्ये पनवेल मधील विविध बचत गटाच्या महिलांनी आपला सहभाग नोंदवला, वरील विविध स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आली.