निमगाव प्रतिनिधी
जवाहर शिक्षण प्रसारक म॔ङळ संचलित निमगाव विघामंदिर व ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांना 2१ सायकलींचे मोफत वाटपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिवा स्वयंप्रभा इनामदार होत्या निमगाव परिसर बहुसंख्य नागरिक हे वाङया वस्त्यावर शेतात राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पाच ते सात किलोमीटरवर पायी चालत यावे लागते ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे.
ही गरज ओळखून या पुर्वी मल्ल सम्राट रावसाहेब मगर यांनी ७ सायकली श्रीनिवास इनामदार संभाजीराव मगर यांनीही सायकली विद्यार्थ्यांना दिल्या होत्या या शैक्षणिक वर्षांत पुणे येथील ॲड गजानन नंदकुमार गुंजेवार यांच्या जीएनजी या ग्रुपच्या माध्यमातून सायकल खरेदीसाठी ५२००० / - रुपये देणगी देण्यात आली शिवाय शिक्षण प्रसारक मंङळाच्या ८सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंङळाचे उपाध्यक्ष महादेव मगर सह सचिव बबनराव जाधव मुख्याध्यापक तानाजीराव ननवरे मधुमती सवणे ,रामचंद्र आसबे सुश्रिय इनामदार बेंदगुङे सर काकासाहेब मगर यासह सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते धनाजीराव जाधव यांनी आभार मानले