विशेष लेख
आज काल शिकलेली युवा पिढी असो, या न शिकलेली,शिकलेले युवा नेतृत्व असो, या न शिकलेले युवा नेतृत्व, निवडणूक मिरवणूक असो,सण असो या उत्सव असो,लग्न असो या यात्रा असो, या भावाचा वाढदिवस,या घरातील साधा कार्यक्रम असो सर्रास ठिकाणी DJ चा वापर केला जात आहे. किंबहुना ही प्रथाच पडू लागली आहे.मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ दाखविण्यासाठीच...
साधारणपणे मनुष्य 70 DB पर्यंतचा आवाज सहन करू शकतो.पण त्या पुढील आवाज मानवासाठी नेहमीच भितीदायक व धोकादायक आहे. 75 Db आवाजाचा शेजाराच्या कुत्रा जरी भुंकला तरी त्याच्या अंगावर आपण धावून जाणारे आज गप्प का ? आज DJ फॅशनच्या कालावधीमध्ये DJ चा आवाज हा 110 DB पेक्षा कमी असेल असे मला वाटत नाही .त्याचा आवाज हा लहान मुले, आजारी व्यक्ती, म्हातारी माणसे,गरोदर स्त्रिया तसेच गोरगरिबांनी आसरा म्हणून बांधलेली घरे यांना किती त्रास सहन करावा लागत असेल. यांनी आवाज उठवला तर ऐकून कोण घेतो..यांची अवस्था पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची अशी झाली आहे...
DJ वर ना प्रशासनाचा वचक ,ना पोलीस यंत्रणेचा वचक, Noise Pollution विभाग आहे की नाही माहीतच नाही ? या सर्वांच्या समोर हा धिंगाणा होत असताना. अशा यंत्रणा मुग गिळून गप्प का असतात. हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.
DJ च्या आवाजाचं संकट प्रशासन व राजकीय व्यक्तींच्या घरात घडल्यावर यांचे डोळे उघडणार आहेत का...?
पण प्रश्न असा आहे की, या DJ समोर बेधुंद होऊन नाचणारी मंडळी कधीच प्रशासनील व कधी राजकीय ( फक्त मोठ्या ) घरातील पाहवयास मिळणारच नाही. DJ चे तालावर राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री,IAS, IPS अधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्ते,विरोधी पक्षनेते यांनी कधी ठेका धरलाय असे पाहावयास मिळाले आहे का...? यांच्या घराजवळून असे DJ वाजत जातात का...?
DJ एक सामान्य लोकांची समस्या झाली आहे... याकडे कोण लक्ष देता का ओ....?
आमचे कोळा ता.सांगोला जि.सोलापूर येथे तर DJ च्या मालकात स्पर्धाच लागलेली असते.तसेच तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ दाखविण्यासाठी DJ चे ग्राहक वाजिव की म्हणत बेधुंद असतात. मला वाटतं तो आवाज 120 Db च्या वर नक्कीच असणार..Noise Pollution वर काम करणारी यंत्रणा काहितरी बरे वाईट घडल्यावर सतर्क होणार आहे का..? वाईट घटना घडण्या अगोदर सावध होणार आहे का...? हा गोरगरीब व सर्व सामान्यांना पडलेला प्रश्न आहे.
प्रा.आनंदा आलदर