*बाल गीत-गाणी* (३)
--------------------------------
जंगल सहल
एक पाहिला वाघोबा
होता उभा जंगलात |
धूड अजस्त्र भयाण
आम्ही सारेच गाडीत ||१||
उड्या मारत माकडे
इथे तिथे धाव घेत |
खारुताई इवलीशी
इकडून तिकडे पळत ||२||
हरणांची शिंगे छान
सान इवले पाडस |
वाटे कान टवकारी
कित्ती लोभस गोंडस ! ||३||
होता हत्तींचा कळप
खात चारा भराभरा |
घेत डुलकी अस्वल
सुस्त झाले दिसे जरा ||४||
मग पाहिला जिराफ
मान त्याची लांब फार |
काळा पांढरा पट्टेरी
झेब्रा होता थोडा दूर ||५||
मोर, चिमण्या, पोपट
पंख सुंदर रंगीत |
किलबिल ऐकताना
वाटे मधुर संगीत ||६||
सौ. लता सुरेश पाटील
पनवेल, रायगड.
भ्रमणध्वनी : ८०९७९८३२५८
*अल्पपरिचय*परिचय
नाव : सौ. लता सुरेश पाटील
गाव : पनवेल, रायगड.
शिक्षण : विद्युत अभियांत्रिकी पदविका,हुद्दा : गृहिणी
लेखनाला खरी गती २०१९ पासून मिळाली. तेव्हापासून सातत्याने कविता, लेख लिहिणे चालू आहे.
२७ फेब्रुवारी २०२१ रोजी “काव्यलता” हा पहिला काव्यसंग्रह चेन्नईच्या नोशन प्रेसने प्रकाशित केला आहे.
हे पुस्तक नोशन प्रेस, ॲमॅझाॅन आणि फ्लिपकार्ट वर भारत, अमेरिका व इंग्लंड मध्ये उपलब्ध आहे.
पुरस्कार : “काव्यलता” या काव्यसंग्रहासाठी
१) मराठी साहित्य मंडळाकडून “राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण “ पुरस्कार.
२) अखिल भारतीय साहित्य परिषद, नाशिक यांच्याकडून
स्व. अर्जुन कचरू पा. गायकर स्मृती विशेष पुरस्कार २०२२.
अनेक काव्यसमूहांच्या काव्यलेखन उपक्रमात सहभाग आहे. अभंग, षडाक्षरी, पंचाक्षरी, अष्टाक्षरी, हायकू, मुक्तछंद, गझल इत्यादि काव्यप्रकारांत काव्यलेखन केले आहे. अलक, लेख लिहिले आहेत.
काव्यस्पर्धेत आतापर्यंत तीन कवितांना सर्वोत्कृष्ट, नऊ कवितांना ‘उत्कृष्ट’ नामांकन, एका कवितेला 'प्रथम'
आणि तीन काव्यरचनांना ‘उत्तेजनार्थ’ नामांकन मिळाले आहे.
*संकलन,संकल्पना व मांडणी*
*नवनाथ अर्जुन पा गायकर*
*आहुर्ली,पो.सांजेगाव,ता.ईगतपुरी, जि.नाशिक*४२२ ४०२*
*मो.नं. ९८८१३२९७०९,९७६३८२७७०८*
*ईमेल-9nathgaikar@gmail.com*
( *आपल्याला बाल गीत-गाणी कशी वाटली हे अवश्य कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियाचीं नक्की वाट पाहु....*🙏)
चित्र काढून सुंदर रंगवा