पंढरपूर प्रतिनिधी
आयआयटी कॉम्प्युटर पंढरपूर मधे मातृदिना निमित्त विध्यार्थ्यानी आई ला क्लास मध्ये बोलाऊन कॉम्प्युटर चे धडे दिले.
आपण MS-CIT मधे काय शिकलो ? त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि त्यांनाही कॉम्प्युटर शिकवले. आपल्या मुलांची कॉम्प्युटर वर कमांड देणारी बोटे पाहून आई कुतूहलतेने कॉम्प्युटर कडे पाहत होत्या.
प्रत्येक जण आपल्या आईला कॉम्प्युटर शिकऊन मदर्सडे चे गिफ्टच देत होते. ERA चालू करून आपली मार्क्स दाखवत होते, ERA कसा शिकवतो हे अपल्या आईला समजावत होते.
रोज शेतात राबणाऱ्या व घर कामात व्यस्त असणाऱ्या माता मुलांकडून कॉम्प्युटर चे ज्ञान घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.
आयआयटी कॉम्प्युटर मध्ये सर्व माताचे स्वागत डॉ.श्रद्धा विक्रम कदम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले आणि मदर्सडे च्या शुभेच्या दिल्या .
आयआयटी कॉम्प्युटर चे संचालक नितीन आसबे सर यांनी आई चे महत्व सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता कळकुंबे,रोहिणी मांजरे यांनी परिश्रम घेतले. वैष्णवी पाटील यांनी आभार मानले.