गादेगाव प्रतिनिधी
गादेगाव येथे जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थांनी तंबाखू गुटखा यांची व्होळी केली.
यावेळी सरपंच वंदना बागल, उपसरपंच लता हूंडेकरी, संचालक मोहन बागल, संचालक तानाजी बागल, सिताराम बापू बागल,भाजपचे जिल्हाउपध्यक्ष गणेश बागल, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बागल,संजय बागल ,शांतिनाथ बागल, ग्रामसेवक जयंत खंडागळे, राजेंद्र हुंडेकरी , बाळासाहेब वाघमारे अंगणवाडी सेविका मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मनसेचे अनिल आप्पा बागल, डॉक्टर अभिजीत रेपाळ, माजी उपसरपंच गणपत मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी गावातील बऱ्याच ग्रामस्थांनी तंबाखू सोडण्याचा निश्चय केला गादेगाव येथे गेली दहा वर्ष पासून सामाजिक कार्यकर्ते अनिल आप्पा बागल , गणपत मोरे, गणेश बागल, वाल्मीक कोळी हे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत. गावातील तरुण वर्ग व्यसनापासून प्रवृत्त व्हावा यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो