सोलापूर प्रतिनिधी
प्रत्येकांनी आयुष्यात चांगले कार्य करावे.चांगल्या कार्याने इतिहास निर्माण करता येते.निरपेक्ष भावनेने केलेल्या चांगल्या कार्याची इतिहास नक्कीच वाचता येते असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले व सहशिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी आशीर्वचनात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. व्यासपीठावर मनपा प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर, माजी नगरसेवक गुरुनाथ धुतरगांवकर, विस्तार अधिकारी राजशेखर नागणसुरे, माजी विस्तार अधिकारी अशोक भांजे, केंद्र प्रमुख स्वप्निल चाबुकस्वार, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मन्मथ उकरंडे व सर्व पदाधिकारी, लेखापरीक्षक महेश आळंगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, संस्थेचे हितचिंतक राजशेखर फताटे, सिद्धेश्वर नरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे महास्वामीजींनी आशीर्वचनात, हुल्ले व त्रिशूले परिवारात सुख-शांती, समृद्धी, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी शुभ संदेश दिले.
संस्थापक अण्णाराव कुंभार म्हणाले,हुल्ले सर व त्रिशुले सर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे संस्थेची व या परिसरातील पालकांची प्रगती झाली आहे.त्यांनी संस्थेवर मनापासून विश्वास, प्रेम , निष्ठा, भक्ती ठेवून कार्य केले. जबाबदारीने कष्ट व मेहनत घेतल्यामुळे संस्थेचे नाव लौकिक झाल्याचे सांगितले.
यावेळी मन्मथ उकरंडे व रेवणसिद्ध रोडगीकर यांनी हुल्ले व त्रिशुले यांच्या शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून केलेल्या कार्याची कौतुक केले. लक्ष्मीकांत त्रिशुले व विजयकुमार हुल्ले यांनी सत्काराला उत्तर देताना नेताजी परिवाराची कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजराजेश्वरी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, वैशाली कुंभार, धर्मराज बळ्ळारी, गणपती पाटील, विश्वनाथ तंबाके, शिवानंद स्वामी, शिवानंद पुजारी आदीसह सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. यावेळी हुल्ले व त्रिशूले परिवारासह बहुसंख्य पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.