पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्वेसर्वा व राज्य सभा खासदार शरदचंद्रजी पवार यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने शरदचंद्रजी पवार यांचा सत्कार ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व संभाजी शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.
त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, चेअरमन अभिजीत पाटील, संदिप मांडवे व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

