यशश्री अकॅडमी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!
भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथील यशश्री अकॅडमी मधील इ 12 वी ची 100% निकालाची परंपरा कायम असून येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
प्रथम क्रमांक रोहित बाळासो उमडाळे 80.83%, द्वितीय क्रमांक सानिका संतोष उमडाळे 79.33% व तृतीय क्रमांक शिवराज विजय मोरे 76.17% या विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत.
या विद्यार्थ्यांना अकॅडमी चे संचालक प्रवीण लिंगडे,रणजितसिंह लोखंडे ,अमर शिंदे,सोनाली शिंगटे,नवनाथ पांढरे, किशोर हाडमोडे,प्रदीप खिलारे,संदीप काळे,अण्णा शिंदे, रणधीर लिंगडे,संजय कस्तुरे,विठ्ठल बोचरे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ, शिक्षक,पालक व सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.