खासदार रणजितसिंह यांनी मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
फलटण प्रतिनिधी
जलसंपदा विभाग कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत माढा तालुक्यातील खैराव मानेगाव उपसा सिंचन योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक दशके कायम दुर्लक्षित ठेवलेली योजना होती सीना नदीवरील भीमा सिना जोड कालव्याच्या मधून ७३०.४८द.ल.घ.फु इतक्या पाण्याची बचत होत असल्याने सदर पाणी प्रस्तावित खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी वापरता येणे शक्य आहे ही बाब खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिली .
यानंतर शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी पूर्व व्यवहार्यता अहवाल PFR तयार करून प्रस्ताव नियामक मंडळा पुढे ठेवण्यात आला. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी माढा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पासाठी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली व या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदय यांनी खैराव मानेगाव उपसून सिंचन योजनेच्या पूर्व्यवहारिता अहवालास PFR तत्वता मान्यता देण्यात आली. असे निर्देश दिले त्यानंतर महामंडळाकडून खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्व्यवहारिता अहवाल तयार करून शासनाची मान्यता मिळणे साठी सदर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यास आज शासनाने मंजुरी दिली व नियामक मंडळाकडे कार्योत्तर मान्यता घेण्यासाठी साठी पाठवले आहे .
ही योजना मंजुरी चे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आज देण्यात आले. यामुळे माढा तालुक्यातील ५० वर्षापासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या १२ गावांना शेती पाण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे व या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे. त्यामुळे या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे त्यामुळे या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पुढील निवडणुक ही माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावर होणार नाही असा शब्द दिला होता तो आज आपणाला पूर्ण होताना दिसत आहे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही जलसंपदा विभागाच्या उपसा सिंचन योजना होत्या त्या सर्व मार्गी लागलेल्या आपणास दिसत आहेत. त्यामुळे हा दुष्काळी लोकसभा मतदारसंघ म्हणून भविष्यामध्ये ओळखला जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लवकरच या भागातून पाणी फिरल्यानंतर या पट्ट्यातील अनेक छोटे मोठे व्यवसायीक प्रकल्प तयार होतील व मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी आशाही खासदार निंबाळकर यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.