पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुरात स्वराज्य पक्षाची पंढरपूर विभागाची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गत लवकरच स्वराज्य गावोगावी पोहोचविण्याचा पंढरपूर विभागातील पदाधिकाऱ्यांचा संकल्प करण्यात आला आहे.
आज पंढरपूर विभाग स्वराज्य पक्षाची बैठक स्वराज्य प्रमुख छञपती संभाजीराजे यांच्या आदेशाने योगभवन हॉल येथे स्वराज्य प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीला राज्य कोर कमिटी सदस्य विजय वाहुळे,किरण डोखे,ज्येष्ठ नेते विष्णुपंत घुगे, ह.भ.प.संतोष महाराज पवार, ह.भ. प.मोहिते महाराज,वैभव दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर शहराध्यक्ष पदी धनराज लटके तर पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्षपदी गणेश माने, शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख पदी पांडुरंग मामा मोरे,उद्योजक आघाडी जिल्हाप्रमुख पदी भाऊ जगताप, पंढरपूर तालुकाप्रमुख युवक आघाडी पदी संग्राम जगताप यांची आज निवड करण्यात आली.
बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी सांगितले की, आजची ही आढावा बैठक अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण जशी यशस्वी केली त्याचप्रमाणे आता संभाजीराजे संकल्पित गाव तिथे शाखा व घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील गावागावात आपण स्वराज्य पोहोचविण्यासाठी काम करायचे आहे.
आजच्या या बैठकीला सोलापूर प्रा महादेव तळेकर हे काही शासकीय कामानिमित्त बाहेर गेल्याने उपस्थित राहू शकले नाही तरी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांची जिल्हा प्रमुख पदी नियुक्त आज देण्यात आलेली आहे.
लवकरच पुढील कार्यक्रम घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व आघाड्यांची पदनियुक्ती करण्यात येतील. यासाठी आज नियुक्ती दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य पक्षाच्या बांधणीसाठी कामाला लागायचे आहे, आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे आपल्या सगळ्यांना समाज उपयोगी कामाचा दांडगा अनुभव आहे संघटन बांधणी कशी करावी यात आपण सर्व तरबेज आहात त्यामुळेच आपल्यावर ही जबाबदारी आज निश्चित करण्यात आलेली आहे.
यावेळी राज्य कोर कमिटी सदस्य विजय वाहुळे यांसह धनराज लटके, संतोष महाराज पवार, मोहिते महाराज यांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.