अवघ्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना ५० कोटी ५५ लाखांची मदत वितरित.
युती सरकारच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना सढळ हस्ते मदत.
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने माझ्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे.
त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १० कोटी २७ लाख, आणि मार्च २०२३ मध्ये विक्रमी ११ कोटी ९५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य - गोरगरीब गरजू रुग्ण पैशाच्या अभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच पहिल्या दिवशी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या टीमला दिला होता. या सूचनेचे तंतोतंत पालन करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम या टीमचे सर्व सहकारी करीत असल्याचा मला अभिमान आहे.
- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे