मोहोळ प्रतिनिधी
दिनांक 21 ते 23 एप्रिल 2023 दरम्यान अमरावती येथे झालेल्या शालेय धनुर्विद्या स्पर्धेत मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील ए जे आर्चरीच्या खेळाडूंनी यश संपादित करीत पुन्हा एकदा आपली दावेदारी दाखवली आहे.
AJ आर्चरीची सुवर्णकन्या कुमारी शेजल शिवाजी चव्हाण हीने ओहर ऑल गोल्ड मेडल टीम गोल्ड मेडल वैयक्तिक तीन गोल्ड मेडल व वैयक्तिक एक सिल्वर मेडल व इरफान राज महंमद मुजावर याने टीम गोल्ड मेडल व पृथ्वीराज संजय चवरे याने लक्षवेधी कामगिरी करत वैयक्तिक सिल्वर मेडल व सांधिक गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे.
या अकॅडमी चे संस्थापक अजित वसेकर , सागर सुर्वे , विठ्ठल माळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे यांनी अभिनंदन केले