पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचालित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पंढरपूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन तंत्रविभाग प्रमुख नानासाहेब देवकते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाराध्ये उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे ,पर्यवेक्षक सुनिल पाटील ,जेष्ठ लिपिक हनुमंत मोरे,बाबसाहेब सिरसट. राजूभाई मुलाणी, अशोक पवार ,नितीन कदम,बाळासाहेब करपे, रुपाली भुसे,सविता उपलप, प्राची कोळसे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.