श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित,
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल अमृतमहोत्सवी पर्व आंतरराष्ट्रीय भरडधान्य व कडधान्य वर्ष : 2023
▪️ उपक्रम 3 रे : नाचणी डे 9.03.2023
सोलापूर प्रतिनिधी
वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित करण्यात आले असून श्री सिद्धेश्वर देवस्थान गुणवत्ता वाढ समितीचे चेअरमन मा.डॉ. श्री राजशेखर येळीकर सर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमापैकी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ' नाचणीडे' साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या डब्यामध्ये नाचणी पासून तयार होणारे अनेक नाविन्यपूर्ण अन्नपदार्थ (उदा. बिस्किटे,लापशी,लाडू,भाकरी, पिझ्झा, आईस्क्रीम, समोसा, थालीपीठ,डोसा,वडी, पापडी केक आणले होते..
तसेच भरडधान्याची माहिती जास्तीत जास्त महिला पालकांना व्हावी यासाठी महिला दिनानिमित्त पाक कला स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक प्रशालेचे मुख्याध्यापिका बऱ्हाणपूरे मॅडम तसेच सहशिक्षिका कोमल परांजपे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी भरपूर महिला पालकांनी उदंड प्रतिसाद दिला व उपक्रमाचे कौतुक ही केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक श्री. सतीश गोसावी, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद ,पालक यांचेही सहकार्य लाभले.