सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व लायन्स क्लब सोलापूर रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही क्लबला प्रांतपालांचे अधिकृत भेट आयोजित करण्यात आली होती व जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आणि लायन्स इंटरनॅशनल च्या माजी आंतरराष्ट्रीय संचालिका ला.अरुणाजी ओसवाल यांच्या वाढदिवसानिमित्त
सौ. माधवी कुलकर्णी (उपसंपादक दैनिक दिव्य मराठी )
डॉ. गौरी बाचल (होमिओपॅथिक तज्ञ)
सौ. संघमित्रा कांबळे (शिक्षिका)
डॉ. शुभ्रा अग्रवाल (नेत्ररोग तज्ञ)
सौ. रजनी माने (पोलीस नाईक)
सौ. अनुराधा विभुते(शिक्षिका)
डॉ. सौ राणी मोटे ( डॉक्टर)
सौ. तृप्ती पुजारी चराटे (महसूल सहाय्यक)
सौ. रेणुका बुधाराम (कवियत्री)
अशा विविध क्षेत्रातील 9 महिलांना लायन्स क्लब प्रांत 32 34 ड-१ चे प्रांतपाल MJF ला. राजशेखरजी कापसे यांच्या हस्ते व माजी प्रांतपाल ला. डॉ. नारायणदासजी चंडक झोन चेअरमन ला.शैलेश कोरवार व अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे व डॉ. शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर प्रांतपालांनी लायन्स क्लब सोलापूर सिटी चे अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांचा संपूर्ण वर्षभराच्या कार्याचे कौतुक कले व दोन्ही क्लब ने आठ दिवस अरुणोदय महिला सप्ताह मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन कले आणि अध्यक्ष सागर पुकाळे यांना मल्टिपल अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
तसेच लायन्स क्लब रॉयल चे अध्यक्ष ला. डॉ. शिवाजी पाटील यांचेही कौतुक करत त्यांचाही सन्मान केला. व सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिव इंजि. रविकरण वायचळ सेवा सप्ताह प्रमुख ला. नागेश बुगडे ला. मुकुंद जाधव ला. नंदिनी जाधव ला. ला. डॉ. राहुल चंडक ला. राजीव देसाई ला. वरधा देसाई ला. सोनालिका पुकाळे ला. नागेश चपळग्गी ला. सागर कैयावाले ला. सुरेश कीरनाळ्ळी ला. मधुमती किरनाळ्ळी ला. डॉ. गोमती ठेंगील ला. सुजाता कोरवार ला. कल्पना पाटील ला. नितीन साळुंखे ला. कविता साळुंखे ला. गणेश खेरोडकर ला. उर्मिला खेरोडकर राजशेखर जेऊरे ला म्हमाने यांच्यासह सर्व पुरस्कार प्राप्त व करिते आणि त्यांच्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. ममता बुगडे व ला. डॉ. दौला ठेंगील यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव शिवाजी पाटील यांनी केले