कामगार सेनेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विचार कामगारांच्या घराघरात पोचविण्याचे कामगार सेनेने केले आहे
सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरातील शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यालयास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांनी सदिच्छा भेट देऊन कामगार सेनेचे कार्य हे शिवसेनाप्रमुखांच्या अभिप्रेत असलेले समाज कार्य आहे अशा शब्दात कोकिळे यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या कामाचा गौरव केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ हे महाराष्ट्र कामगार सेनेच्या पद्मशाली चौक येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी कोकिळ साहेबांना कामगार सेनेच्या कामकाजाची संपूर्ण माहिती दिली त्यावेळी श्री कोकिळ साहेब यांनी समाधान व्यक्त करून व वरील गौरवोदगार काढला.
सदर प्रसंगी कोकिळ साहेब यांच्या सह सोलापूर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब ,शहर संघटक अतुल भंवर, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे, संपर्कप्रमुख काशिनाथ बासुतकर ,युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी, व कामगार सेनेचे आणि प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) हे उपस्थित होते त्यावेळी कामगार सेनेच्या वतीने श्री कोकीळ साहेब व श्री शरद कोळी साहेब आणि श्री काशिनाथ बासुतकर साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी वरील मान्यवरासह कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का, शरणाप्पा जंगले, पप्पू शेख, आधी पदाधिकारी व कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.