पंढरपूर प्रतिनिधी
कायदेशीर जागृतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने मा. नालसा व मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक ८ मार्च, २०२३ रोजी जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायाधीश श्रीमती टी. जी. बन्सोड, यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिननिमित्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा महिलांचा सन्मान करावयाचा असल्याने जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे, , यांच्या संकल्पनेनुसार कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विविध क्षेत्रातील महिला मान्यवरांची उपस्थिती होती.
कुठलीही महिला तिच्या, मुलांच्या आणि कुटुंबाच्या हिताचे निर्णय स्वत: घेऊ शकते. त्यातून तीच नव्हे तर सगळे कुटुंब, सगळा समाज पुढे जातो. महिला आता अनेक माध्यमांतून स्वत:च्या पायावर उभ्या राहात आहेत. आज अनेक स्त्रिया वेगवेगळ्या नोकरी करत आहेत. नोकरी बरोबर उद्योग, व्यापार क्षेत्रातही ते आपले कर्तृत्व दाखवत आहे. मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळवले असल्याचे यावेळी न्यायाधीश एम. बी. लंबे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. यादिवशी, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा गौरव केला जातो. महिलांशी संबंधित विशेष मुद्दे घेऊन त्यावर काम करणे आणि त्यांच्या हक्कांबद्दल बोलणे हा महिला दिनाचा हेतू असल्याचे या कार्यक्रमास न्यायाधीश श्रीमती. टी. जी. बन्सोड यांनी सांगितले
न्यायाधीश श्रीमती. एस. ए. साळुंखे यांनी न्यायाधीश महिलांच्या जीवनावर अतिशय उत्कृष्ट कविता सादर केली, तसेच जेष्ठ महिला विधिज्ञ सौ. सी. आर. गेजगे, ज्येष्ठ विधीज्ञ श्री. एस. टी. मेंडीगिरी, विधीज्ञ एस. ए. चव्हाण यांनी महिला दिनानिमित्त महिलांविषयी त्यांचे विचार मांडले.
सदर कार्यक्रमास न्यायाधीश एम. आर. जाधव ,न्यायाधीश एस. एच. इनामदार, न्यायाधीश ए. ए. खंडाळे, न्यायाधीश. ए. आर. यादव ,न्यायाधीश एम. आर. कामत न्यायाधीश, श्रीमती एस. ए. तसेच सुनिल यारगट्टीकर, पांडुरंग अल्लापूरकर, अॅड.अंकुश वाघमारे, विष्णु मैंदर्गीकर व पंढरपूर अधिवक्ता संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, न्यायालयीन कर्मचारी श्री. एम. एम. नरखेडकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव अॅड. श्री.राहुल बोडके तर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. भगवान मुळे कार्यक्रमाची प्रस्तावना केली तसेच अधिवक्ता संघाच्या सदस्या सुकेशिनी शिर्के यांनी आभार मानले.