अकलूज प्रतिनिधी
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व बांधकाम यासाठी १०६ कोटी ६६ लाख रू.तर रखडलेल्या रस्त्यांसाठी,दुरूस्ती देखभाल व ल.पा.तलाव, तलाठी कार्यालय यांच्याकरिता ३२ कोटी १२ लाख ४९ हजार रूपये असे एकूण १३९ कोटी ७८ लक्ष ४९ हजार रूपये विविध विकास कामांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प अधिवेशन २०२३ मध्ये मंजूर केली असल्याची माहिती आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली आहे.
तसेच आ.मोहिते-पाटील यांनी तालुक्याच्या पायाभूत सुविधेच्या विकासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
मांडकी, निमगाव, पिरळे, पळसमंडळ खोरोची कन्हेर, बागेचीवाडी, सदाशिवनगर, पठाणवस्ती, तांदुळवाडी, भांबुर्डी,धानोरे खुडूस, विजयवाडी,, बोंडले, पळसमंडळ, बचेरी, काळमवाडी, रे, गारवड, कचरेवाडी, बाबुळगाव कुरबावी, मारकडवाडी, इस्लामपूर, वेळापूर, कोथळे, भांब, गिरझणी, कोंडबावी सदाशिवनगर, खंडाळी,
इस्लामपूर, वेळापूर माळीनगर, खंडाळी, कळंबोली आदी तालुक्यातील गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत तालुक्यातील विविध गावांतील रखडलेल्या रस्त्यांसाठी, रस्तेविकासाठी, ल.पा.तलाव, तलाठी कार्यालय,विश्रामग्रह यासाठी तब्बल १३९ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली गेल्याने तालुक्यातील दळणवळाला गती प्राप्त होणार आहे. विद्यार्थी, व्यापारी , शेतीमाल, प्रवासी दळणवळ-वाहतूक सुकर होणार असून विकासला चालना मिळणार आहे. माळशिरस तालुक्यातील जनतेने देखील आ.मोहिते-पाटील यांचे आभार मानत त्यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले आहे.