अकलूज प्रतिनिधी
काळी हळद जवळ बाळगल्याने मोठा लाभ होतो. अशी बतावणी करत मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकास मुंबई, पुण्यासह अकलूजच्या व्यक्तींनी सुमारे ६४ लाख ४५ हजार रूपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही काळी हळद या बांधकाम व्यावसायिकास भलतीच महागात पडल्याने संपत्तीचा मोह किती वाईट असतो याचा अनुभव आला आहे.
आरोपी कालिदास लडकू पाटील (रा. जांभीवली, ता. भिवंडी, जि. ठाणे), योगेश दादा दावले (रा. शिक्षक कॉलनी, संग्रामनगर, अकलूज), हेमंत किसन काटे (रा. आकुर्डी, पुणे), अतुल मधुकर ताम्हाणे (रा. कळवा, ठाणे), अवधुत केशव शाबासकर (रा. मुंब्रा, ठाणे) व मंिच्छद्र हनुमंत डोंगरे (रा. अंबरनाथ, कल्याण) या व्यक्तींनी घाटकोपर-मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण धनजी सेंगाणी यांच्याकडून काळ्या हळदीचा चमत्कार सांगून वेळोवेळी ६४ लाख ४५ हजार रूपये घेतले. काळ्या हळदीचा प्रभाव पडेल आणि आपली भरभराट होईल. काळी हळद आंतरराष्ट्रीय बाजारात करोडो रूपये किलो दराने विकली जाते. या भ्रमात राहून सेंगजी यांनी संबंधित व्यक्ती कडे पैसे दिले. परंतु नंतर आपली फसवणूक होतेय हे लक्षात येताच पोलिसांनीकडे तक्रार केली .आणि पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, डीवायएसपी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, पोलीस अंमलदार सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी, विक्रम घाटगे, शिवकुमार मदभावी, रविराज नागरगोजे, अजित कडाळे, . श्रीकांत निकम यांनी केली.