पंढरपूर प्रतिनिधी
स्वेरीमध्ये संशोधन विभागास जेंव्हापासून सुरुवात झाली आहे तेंव्हापासून स्वेरीत संशोधनाचे विविध आविष्कार पहावयास मिळत आहेत. सध्या प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देखील संशोधनाचे वारे वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रसन्न संतोष थलपती यांनी २५ पेक्षा अधिक ‘मशीन लर्निंग’ प्रोजेक्ट तयार केले असून त्यांचे शिवजयंतीच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे डॉ.राजकुमार कदम यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित उदघाटन करण्यात आले.
हे प्रोजेक्टस आर्टिफिशियल इंटेलीजन्स या क्षेत्रामधील असून ते ‘मशीन लर्निंग’ वर आधारित आहेत. प्रेडीक्शन, डिटेक्शन आणि क्लासिफिकेशन अशी वेगवेगळी कामे त्यांच्या ‘मशीन लर्निंग’ मॉडेल्स कडून केली जातात. त्यांचा फायदा दैनंदिन जीवनात अंदाज लावणे, भविष्यातील घटना वर्तवणे, विविध विभागात वर्गीकरण करणे यासाठी होतो. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसन्न थलपती यांनी संशोधनात गरुडझेप मारली आहे. थलपती हे बार्शी येथील रहिवासी असून त्यांनी लहानपणापासून संशोधन क्षेत्रात विशेष रस घेऊन या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे.
दहावीपर्यंत सुलाखे हायस्कूल तर एमआयटी मधून बारावी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर स्वेरी अभियांत्रिकीच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. स्वेरीमधून स्वतःच्या संशोधनाला त्यांनी अधिक गती मिळवली. वडिलांचे मोबाईल रिपेअरिंग व स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान असून मोबाईलच्या खराब झालेल्या पार्टचे संशोधन करायचे आणि त्याचा इतरत्र कुठे वापर करता येईल का यावर शोध करत त्यांनी उत्सुकता वाढवली. पुढे मशीन लर्निंग वापर फ्रॉड डिटेक्शन करणे, वर्गीकरण करणे यासाठी होत असून हे प्रोजेक्ट हवामान खाते, व्यापारी क्षेत्रात आणि सुरक्षा विभागात मोलाचे योगदान देऊ शकतात. त्यांनी सर्व प्रोजेक्टसचा एकाच ठिकाणी संग्रह देखील केला आहे. प्रसन्न थलपती हे ‘बेस्ट लिन्कड इन प्रोफाईल’ स्पर्धेचे विजेते असून त्यांनी स्वेरीच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे डॉ. राजकुमार कदम, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पसचे इन्चार्ज, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, इंजिनिअरिंग व फार्मसीचे स्टुडंट कौन्सिलचे सचिव, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पब्लिश बटन क्लिक करून त्यांच्या ‘मशीन लर्निंग प्रोजेक्टस’चे उदघाटन करण्यात आले. कमी वयातच २५ पेक्षा अधिक प्रोजेक्ट बनवल्यामुळे प्रसन्न थलपती यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.