सोलापूर प्रतिनिधी
पोलिस बॉईज असोसिएशन, विजापूर नाका पोलिस स्टेशनचे महिला दक्षता समिती, यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दीन नमिता थिटे यांच्या अध्यक्षतेखाली विजापूर नाका पोलिस स्टेशन येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली गुंड यांनी केले.P.I व्हनपुडे -पाटील साहेबांच्या हस्ते व P.S.I. विद्या जाधव मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणुका महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, पोलिस बॉईज असोसिएशनचे पदाधिकारी, दक्षता समितीचे महिला सदस्य, व विजापूर नाका पोलिस स्टेशन पोलिस महिला कर्मचारी या सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.P.I. व्हनपुडे -पाटील साहेबांनी उपस्थित महिलांना सतर्क राहण्याचे,आपले सोनं, सांभाळण्याचा सल्ला दिला. अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीसांना सहकार्य करा. काही तक्रार असल्यास त्वरित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्या. कायद्याच्या चौकटीतून आपल्याला मदत करेन असं सांगितले.
P.S.I. विद्या जाधव मॅडम यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा, शोशल मिडीयावर क्राईम, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलींची छेडछाड,एक तर्फी प्रेम. यासाठी आईनी वयात आलेल्या मुलींशी कसे वागावे,व संस्कार,व आपली संस्कृती यावर मार्गदर्शन केले. वैशाली देशपांडे, वैशाली वळसंकर, संध्या उपाध्ये,मंदा करोगल, शीला खमितकर, ज्योस्ना काकडे, अर्चना सुपेकर,आरती डींगरे, अनिता कुलकर्णी,रेखा पाटील, अर्चना कटारे, अनुजा काकडे, संध्या मळेकर, ॲड मानसी कुलकर्णी, जयश्री हिरेमठ, जयश्री अगाव, सुरेखा गोबूर, पूजा कुलकर्णी, संध्या काळे, सुरेखा गायकवाड या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संयोजन नमिता थिटे, वैशाली गुंड यांनी केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल वंदना घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल गवसाने, पोलिस कॉन्स्टेबल भिमाशंकर भिंगे, व सर्व महिला पोलिस कर्मचारी यानी परीश्रम घेतले. पोलिस कॉन्स्टेबल वंदना घाडगे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.