शिक्षक,पालक,आणि विद्यार्थी यांच सहकार्य लाभल्यास आदर्श शाळा होण्यास वेळ लागत नाही
करकंब प्रतिनिधी
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि पंचायत समिती पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत फेब्रुवारी महिन्याची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती बार्डी येथे केंद्र पांढरेवाडी व करकंब केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन म्हणून वातावरण सुंदर करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच अभिजित कवडे केंद्रप्रमुख धोंडीबा क्षीरसागर आप्पासाहेब माळी तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर वसेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक वसेकर उपाध्यक्ष नितीन वसेकर, कांतीलाल वसेकर कल्याण कवडे, नामदेव माळी,शेखर कोरके, बिभिषण वसेकर भानुदास शिंदे,अरुण माळी, सुनिल वसेकर,राणी लेंगरे,देवकी दुधाणे मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
त्यानंतर फैय्याज इनामदार, सुर्यकांत बनकर, दत्तात्रय खंदारे,रामा कवडे,मनिषा ढोबळे,देवकी दुधाणे उपसरपंच अभिजित कवडे यांनी मनोगतात सांगताना सांगितले की दुर्गम ग्रामीण भागातील वस्तीशाळा कशी असावी,पालक विद्यार्थी आणि शिक्षकांच सहकार्य असल्यानंतर किती बदल होतो याचं सुंदर उदाहरण वाफळकरवस्ती शाळा असून शाळेचं वातावरण अतिशय सुंदर केल्याबद्दल पदाधिकारी दोन्ही केंद्रातील शिक्षक, शिक्षिकांनी भरभरून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला,यावेळी करकंब केंद्राचे केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी.व पांढरेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख धोंडीबा क्षीरसागर यांनी प्रशासकीय सुचना दिल्या यावेळी करकंब व पांढरेवाडी केंद्रातील अनेक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .
त्यानंतर वाफळकरवस्ती ग्रामस्थांच्या सहकार्याने भोजनाचा आस्वाद घेत एक आदर्श शाळा कशी असावी ही भावना मनात ठेऊन सर्वांनी निरोप घेतला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत आभार मुख्याध्यापक किरण ढोबळे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास वसेकर, हणमंत वसेकर,धनाजी वसेकर, ब्रह्मदेव वसेकर,सावता वसेकर,लक्ष्मण वसेकर, समाधान वसेकर,गोरख वसेकर,भजनदास वसेकर,बापू वसेकर,रमेश वसेकर,संजय माळी,संतोष माळी, अशोक माळी,नवनाथ माळी,या.वाफळकरवस्ती वरील सर्व पालकांनी महिलांनी सहकार्य केले.