सोलापूर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परिक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धा संपूर्ण भारतात इयत्ता सातवी ते बारावी पर्यतच्या विद्यार्थीसाठी घेण्यात आल्या त्या मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यांतील पाच शाळेने सहभाग घेतला त्यामध्ये कारंबा येथील मुनाळे प्रशालेच्या ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी श्वेता गणेश आदाटे द्वितीय क्रमांक अनिशा कुमार जैन तृतीय क्रमांक रूक्मीणी सोमनाथ ढेरे हिने मिळविला.
बक्षिस समारंभ कार्यक्रमास उत्तर सोलापूर भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संभाजी दडे , उत्तर सोलापूर भाजप सरचिटणीस विनायक सुतार माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके आप्पासाहेब गुंड शशीकांत दुधाळ सत्तारभाई शेख रजपूत दुलंगे कांबळे, लोहार व विद्यार्थी अदि जन उपस्थित होते.
विनायक सुतार आपल्या भाषणात म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना विविध स्पर्धात भाग घेवुन आपले कौशल्या सिद्ध करण्याची संधी मिळते संधीचे सोने करावे असे म्हणाले.
सुत्रसंचालन व आभार कांबळे यांनी मानले विजयी विद्यार्थिना स्मुतीचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले.