भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील एसटी स्टँड परिसरात एड्स जनजागृती निमित्त जय भवानी कला पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई वडाळा यांच्या वतीने एड्स व ए आय डी एस यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स विषयी जनजागृती कार्यक्रम पंढरपूर तालुक्यातील विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता.
यावेळी या कार्यक्रमास सरपंच राजकुमार पाटील, रुग्णालयाचे समुपदेशक बाजीराव नामदे, योगेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे लिंक वर्कर मिलिंद गायकवाड, मनीषा पवार तसेच डॉ. अमोल उबाळे,पत्रकार प्रशांत माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांगोला तालुक्यातील जवळा येथील जय भवानी कलापथकाचे शाहीर सुभाष गोरे, मंगल जाधव, प्रताप गोरे, केराबाई पिसे, कुलदीप जाधव, विक्रम गोरे, आदिनाथ लांडगे, नितीन चव्हाण, खंडू भिसे, आदि कलाकार मंडळीनी एड्स विषयी ग्रामस्थांना जनजागृती केली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.