नवी दिल्ली प्रतिनिधी
दिल्ली येथे नॅशनल गौरव अवॉर्ड 2023 "स्त्रीशक्ती गौरव राष्ट्रीय पुरस्काराने" तृप्ती देसाईंचा महिला सबलीकरणासाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी तृप्तीताई देसाई म्हणाल्या की हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून प्रामाणिक काम करणाऱ्या माझ्यासारख्या महिलेला दिल्याबद्दल मनापासून आभार मानते.
यावेळी विज्ञान भवन, दिल्ली येथील कार्यक्रमात मोठ्या सन्मानाने दिल्ली येथील प्रिन्सिपल आणि डिस्ट्रिक्ट जज अविनाशकुमारजी, राष्ट्रसंत बालयोगी संत उमेशगिरीजी (उज्जैन), डॉक्टर विनयकुमार रोहेला ,मोनाजी पनवार या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.