पंढरपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कार्यालय सोलापूर व आय.सी.टी.सी./ए. आर.टी. उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, क्रांती महिला संघ आणि भैरव मार्तंड लोक कलामंच पंढरपूरचे शाहीर श्री.विजय व्यवहारे व सौ.मंगल दळवी व टीमच्या माध्यमातून HIV/AIDS आजाराबाबत शाहिरी अंदाजात एच.आय.व्ही. व एड्स यातील फरक, एच.आय.व्ही. संक्रमणाची कारणे, कोण कोणते इतर रोगांच्या लक्षणाचा समूह दिसून येतो. आजाराबाबतचे समज, गैरसमज तसेच औषध उपचार शासकीय दवाखान्या मध्ये मिळतो याबाबत शाहिरी पथनाट्यातून उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले.
यावेळी पथनाट्यास उपस्थित उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक श्री. पुरुषोत्तम कदम, श्री. योगिराज विजापूरे, श्री. एजाज बागवान, श्री. नागराज येलसंगी, क्रांती महिला संघाचे श्री.असिफ शेख, श्रीम. सुवर्णा नवले, श्रीम. सुवर्णा तुपसुंदर, श्रीम. मिरा कुडके, श्री.अक्षय धोञे इ. सहभागी होते.