सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ड्रॉप रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने ड्रॉप रो बॉल असोसिएशन सोलापूर व एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजनिअरींग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वी सबज्युनिअर मुले व मुली ड्रॉप रोबॉल राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड इंजनिअरींग कॉलेजमध्ये दि. १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव संजय नवले यांच्या अध्यक्षतेखाली, भारतीय ड्रॉप रोबॉल असोसिएशन कोषाध्यक्ष दत्तगिरी गोसावी, महंकाळ प्रमोटर अँड डेव्हलपर्सचे मालक शिवकुमार महंकाळ यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ड्रॉप रोबॉल राज्य संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र सोनजे, सचिव दिनेश अहिरे ,कार्याध्यक्ष राजेंद्र बाणमारे, उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार , सदाशिव बोबडे ' कोषाध्यक्ष विलास निरभवणे राज्य संचालक मुरलीधर राठोड , तांत्रिक कमिटिचे चेअरमन संजय निकम, सोलापूर ड्रॉप रोबॉल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोरे ,शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव , उपाध्यक्ष सुहास छंचुरे,सहसचिव अजित पाटील, बाळासाहेब रणसुर व सर्व जिल्ह्यचे अध्यक्ष ,सचिव आदी उपस्थितीत राहणार आहेत.
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन दिपक आर्वे, राष्ट्रीय हॅन्डबॉल खेळाडू व क्राईम ब्रँच शाखेमध्ये कार्यरत असलेले अजिंक्य माने यांच्या हस्ते होणार आहे
या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० जिल्ह्यातील मुला- मुलींची २५ संघ उपस्थित राहणार आहेत तसेच या स्पर्धेला खेळाडू , प्रशिक्षक, व्यवस्थापक , पंच , पदाधिकारी ,तांत्रिक समिती असे एकूण ४०० जणांची उपस्थिती राहणार आहे या स्पर्धेसाठी खेळाडूंची मैदान निवास व भोजन यांची व्यवस्था सिंहगड इंजनिअरींग कॉलेज येथे केलेली आहे .या स्पर्धेच्या आयोजनासाठी ड्रॉप रोबॉल असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोरे, राज्य उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार , उपाध्यक्ष सुहास छंचुरे , सहसचिव अजित पाटील , संचालक प्रसन्न काटकर गारमपल्ली तौषिक शेख व सिंहगड कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे परिश्रम घेत आहेत .