पंढरपूर प्रतिनिधी
देशाचे नेते मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, भावी पिढी घडवणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कला, क्रीडा, लेखक, कृतिशिल, लेखनिक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना आमदार रोहितदादा पवार, मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार अरुणआण्णा लाड, आमदार यशवंत (तात्या) माने, मा.आमदार दत्तात्रय सावंत या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे नेते संजय शिंदे यांनी तेज न्यूज ला दिली आहे.
पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे, कुंडलिक पवार, सौ. कवडे के.डी., हणमंत शिराळ, राजेश पवार,
युवराज काळे, रमेश देठे, संतोष कुंभार, राजश्री पवार, यास्मिन तांबोळी, कांतीलाल वाघमारे, प्रा.दत्तात्रय काळेल हे मान्यवर या पुरस्काराचे मानकरी असतील
तर न्यू इंग्लिश स्कूल, भाळवणी व जि.प.प्राथ.शाळा,मुंढेवाडी या आदर्श शाळा ह्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत.