खर्डी प्रतिनिधी
खर्डी येथे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचा 55 वा वर्धापन दिन श्री सिताराम महाराज विद्यालय खर्डी प्रशालेत उत्साहात संपन्न झाला. या संस्थेची स्थापना ८ फेब्रूवारी १९६८ रोजी लोटेवाडी येथे झाली. आज सांगोला,पंढरपूर,मंगळवेढा तालुक्यात आठ शाखा व दोन वस्तीगृह कार्यरत आहेत.
यावेळी कै. संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे, कै. भाऊसाहेब कुलकर्णी, कै. आप्पासाहेब कुलकर्णी व ग्रामदैवत सिताराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मुकुंद परिचारक होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना खर्डी येथील प्रशाला स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या सहकार्यातून १९७१ साली सुरू करण्यात आली.
या डिजिटल युगात ही संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवउद्गार काढले व संस्थेच्या शैक्षणिक योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.
संस्थेच्या व विद्यमान पदाधिकारी यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी चेअरमन मुकुंद परिचारक, भगवान सव्वाशे,उपसरपंच शरदभाऊ रोंगे, ग्रा.पं. सदस्य नारायण रोंगे, प्रभारी मुख्याध्यापक चंद्रकांत रोंगे, प्रभारी पर्यवेक्षक आनंदा रोंगे, सहशिक्षक मधुकर गायकवाड, राजू कांबळे, आण्णासो घाडगे, शिवाजी शेजाळ, सचिन शिंदे, सोमनाथ सुरवसे, हरिश्चंद्र ढेरे, महादेव भोसले, गुलाब मस्के, अमोल बाबर, मुकुंद काळेबाग, बाळासाहेब घाडगे, दादासाहेब मोरे ,सुनील घाडगे, मुकुंद नवले, सचिन घाडगे, अण्णा नरूटे सहशिक्षिका राणी नवले, बबिता बाबर ,सविता पोरे, कल्पना मोरे ,सुनंदा लोहार, जयश्री गेजगे सुवर्णा जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत पाटील सर व सूत्रसंचालन प्रदीप वाघमारे तर आभार आप्पासाहेब रोंगे यांनी मांडले.