सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब प्रांत 32 34 ड -१ रिजन-१ च्या वतीने ई-वेस्ट प्रोग्राम संदर्भात सोलापूर महानगरपालिका व लायन्स क्लब यांची संयुक्त मीटिंग सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मा. सौ. शितल तेली उगले व लायन्स क्लब ई वेस्ट ड्राइव्ह प्रोग्रॅम चे विभागीय समन्वयक तथा लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष अभियंता लायन सागर पुकाळे यांच्या अध्यक्षतेखाली व मा. श्री. मच्छिंद्र घोलप उपायुक्त-१ सोलापूर महानगरपालिका आणि मा.सौ. विद्या पोळ उपायुक्त सोलापूर महानगरपालिका आणि लायन शैलेशजी कोरवार उपविभागीय सभापती, लायन नितीनजी साळुंखे, लायन adv. लायन अमिता कारंडे अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक Adv. अमिता कारंडे यांनी करत लायन्स या आंतरराष्ट्रीय संघटने बद्दल थोडक्यात माहिती दिलीतर विभागीय समन्वयक अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांनी लायन्स या संघटनेच्या माध्यमातून ई-वेस्ट ड्राईव्ह हा प्रोग्राम हा इंटरनॅशनल लेवल वर का घेतला जातोय या प्रोग्राम चे फायदे काय व ई वेस्ट चे नुकसान अथवा तोटे काय हे समजून सांगून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे जनजागृती व ई-वेस्ट कलेक्ट करता येत याची सविस्तर चर्चा करून त्यांना सदर बाबींचे निवेदन देण्यात आले.
या सर्व गोष्टी बघून सोलापूर महापालिकेने सकारात्मकता दर्शवली व लायन्सला जे-जे महापालिकेच्या वतीने मदत लागेल ते- ते सहकार्य करण्याचे मान्य केले या बैठकीला महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.