सोलापूर प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल मध्ये दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी दिन उत्साहात पार पाडला .या मराठी दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ निर्मला परमशेट्टी व ज्येष्ठ सहशिक्षिका सौ कविता गुरम यांच्या हस्ते करण्यात आले .
तसेच मराठी दिनाचे विशेष व कवी कुसुमाग्रजांचा यशस्वी जीवनपट थोडक्यात सौ कोमल परांजपे यांनी प्रास्ताविक रूपाने मांडला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितेचे वाचन 'ओळखलंत का सर मला' वर्षाराणी कस्तुरे यांनी सादर केली. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले अष्टपैलू गुणदर्शन केले मराठीतून प्रतिज्ञा, संविधान, मनाचे श्लोक, प्रार्थना व कवी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केली.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज ,संभाजी महाराज ,जिजाबाई राणी ,लक्ष्मीबाई ,सावित्रीबाई फुले विठ्ठल, नामदेव अशा विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढविली इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी लावणी सादर केली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ नीता मोरडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश गोसावी व श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षक समितीचे पालक सदस्य माननीय डॉ.श्री राजशेखर येळीकर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.