उदय वाघवणकर पालघर प्रतिनिधी
जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदय नगर येथील भूमी वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश गवाणकर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सर्वोदय नगर नाका येथे आयोजीत करण्यात आले होते.या संस्थेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
या शिबिरात एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. स्थानिक आमदार रविंद्र वायकर, शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर आणि मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशंसापत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच डॉ. दिपक देसाई यांनी विशेष सहकार्य केले.
आमदार रविंद्र वायकर यांनी या शिबिराला संबोधताना महेश गवाणकर यांच्या आतापर्यंतच्या केलेल्या कार्याचा उल्लेख करून रक्तदात्यांचे आभार मानले.यावेळी डॉ दिपक देसाई, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, रवींद्र साळवी, माजी नगरसेवक अनंत नर, उपविभाग समन्वयक महेश गवाणकर, शाखाप्रमुख सुभाष मांजरेकर, काँग्रेसच्या पदाधिकारी व समाजसेविका सुरक्षा घोसाळकर, स्वप्नील सुर्वे व इतर मान्यवर उपस्थित होते.